- मी माझ्या माणसांकरिता असा धर्म असं जग निर्माण करील जिथे माणूस अत्याचारामुळे मरणाच्या दारात पोहचणार नाही.- क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव गोविंदराव फुले.- यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम...
महात्मा फुलें यांच्या घरातच जयंती साजरी...!! महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यात कोरोनाचे वाढते संकट बघता ज्ञानाचा दिवा लावून महात्मा फुले यांची जयंती साजरी करावी आपआपल्या घरात प्रतिमा व पुतळ्याचे पूजन करून साजरी करण्यात येऊन शासनाच्या सोशल डिस्टन्स सूचनांचे पालन करावे असे आवाहन केले होते. त्यानुसार महाराष्ट्रात आज घराघरात महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करा ,स्त्रियांना शिक्षणाची कवाड खुली करून दिलेल्या महात्मा ज्योतिराव फुले यांना महात्मा गांधींनी महात्मा असं म्हटले होते. महात्मा फुले यांनी त्या काळात अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या बहुजन समाजातील नागरिकांना आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला करून पाणी प्यायला उपलब्ध करून दिलं. त्यांना बरोबर घेत घरात बरोबर जेवण घेतलं. त्यांनी त्यांच्या शिक्षणासाठी संपूर्ण आयुष्य वेचलं असल्याचे त्यांनी म्हटले. ते म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी त्यांनी मोठं योगदान देत गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकातून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. तसेच समाजातील गरिब ...