#साविञीमाई #जयंती #निमित्त
सामान्य बहुजन समाजाच्या मनावर आणि मेंदूवर प्रचलित धर्म व्यवस्थेने आणि तिच्या ठेकेदारांनी नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळे आजवर भारतात धर्म व्यवस्थेचे ठेकेदार जे सांगतील तेच लोकांना सत्य वाटत आले आहे. कारण आपल्या देशात विचार आणि चिकित्सा करायला बंदी आहे ? हे असं का ? ते तसं का ? असले प्रश्न विचारायचे नसतात. “#नदीचं मूळ आणि #ऋषीचं कूळ” कधी शोधू नये असही #धर्माने सांगून ठेवले आहे. त्यामुळे साहजिकच सामान्य माणूस परंपरेच्या नियंत्रणात राहतो. #स्वत:चा मेंदू वापरत नाही. त्यामुळे #विद्येची खरी #देवता कोण असा प्रश्न त्याला पडत नाही. आणि #पडलाच तर कशाला मेलेली #मढी उकरून काढताय म्हणून तो #दुसर्यानाच दोष देत बसणार. परंतु फुले #दाम्पत्याच्या विचाराने जागृत झालेला #बहुजन मात्र स्वताचा मेंदू वापरणारर आणि विचार ही करणार. त्यामुळे त्याला चिकित्सा ही करावीच लागणार. आणि चिकित्सा क्रमप्राप्त आहे. त्याबद्दल धर्म मार्तंड किंवा कुणी इतरांनी त्याला विरोध करायचे कारण नाही. तर सांगायचा मुद्दा असं कि आजवर चिकित्सा न केल्यामुळेच बहुजन समाज #गुलामगिरीत अडकून पडला आहे. आणि होय बा! वृत्तीमुळे तर तो या #दलदलीत खोल रुतत चालला आहे. त्यामुळे विद्येची खरी देवता कोण होवू शकते याचा थोडा चिकित्सक पद्धतीने विचार केला गेला पाहिजे. कारण तमाम बहुजन समाजासाठी #शिक्षणाची कवाडे खुली केली ती #महात्मा #जोतीराव आणि #सावित्रीमाई फुले यांनीच. पण शाळा महाविद्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन होत नाही. अनेक शैक्षणिक #संस्थामध्ये देवतांच्या प्रतिमा लावल्या जातात. परंतु ज्यांनी सुरुवात केली त्यांच्या प्रतिमा मात्र नसतात आणि अशा #शाळा, #महाविद्यालये किंवा #संस्थामधून कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने केली जाते, मात्र ज्या #सावित्रीमाईंनी शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसारासाठी आयुष्य वेचले त्यांची साधी आठवण ही कोणाला होवू नये ? #पहिली स्त्री #शिक्षिका, स्त्री #मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीमाई सर्वश्रुत आहे. परंतु पहिली #स्त्री #शिक्षिका कशी घडली याचा कितीजण गांभीर्याने विचार करतात ? ज्यांना #देवावर श्रद्धा ठेवायची असेल त्यांनी जरूर ठेवावी. त्यांच्या #भावना मला #दुखवायच्या नाहीत किंवा त्यांना #श्रद्धेचा जो #अधिकार आहे तो आम्हाला #नाकारायचा नाही. परंतु ज्या माऊलीने आम्हाला #शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली तीच आमच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ आहे. तीच आमची खरी #विद्येची #देवता आहे. कारण जर #सावित्रमाई आणि #जोतीराव घडले नसते तर कदाचित भारत आजही #अशिक्षित असता. या #दाम्पत्यानेच शैक्षणिक क्रांती घडवली हे #वास्तव #आपल्याला #नाकारून चालणार नाही.
!!#शरीर #माणसाचे #काळीज #वाघाचे..
#हिच #तर #त्यांची #अदा आहे !
#म्हणुनच #तर #महाराष्ट्राची #जाणता
माझ्या "#साविञीमाईवर" #फिदा #आहे..
#साविञीमाई फुले यांच्या #_186_ व्या #जयंती निमित्त #ञिवार मानाचा #सलाम....!
🙏🏻🙏🏻 भागवत खांडेभराड🙏🏻🙏🏻
Comments
Post a Comment