💚 समानतेचा मंत्र 💜
मनुवादयांशी देऊनी झुंज
ज्योतीबांनी तेजावली ज्योत
गुलामीच्या तोडुनी बेड्या
धावला क्रांतीचा वेगात रथ
चिरफाड करुनी परंपरेची
घेतला सत्याचा शोध
क्रांती सूर्यानेच पेरला
घराघरांत उत्कर्ष बोध
प्रहार करूनी सनातन्यावर
तोडल्या जुन्या जीर्ण रूढी
समाजोद्धाराच्या घेऊनी ध्यास
उभारली विदयेची गुढी
कष्टाच्या कमाईची दिली
दाखवून घामाची किंमत
बाजू मांडूनी बळीराजाची
शासन दरबारी दाखविली हिंमत
अंधश्रध्दा आणि कर्मकांडावर
केला घणघाती हल्ला
सुधारणावादी विचारांनी
बांधला पुरोगामी किल्ला
उपेक्षितांसाठी केला
पाण्याचा हौद खुला
स्त्रियांसाठी उघडूनी शाळा
झाला प्रस्थापित ढिल्ला
दत्तक घेऊन यशवंताला
दिला प्रगत विचारा ठेवा
सोबती घेऊनी सावित्री माईला
पेरला समानतेचा मंत्र नवा
आसूड ओढून व्यवस्थेवर
अजूनही बुजला नाही वळ
वाढत चाललीय दिवसेंदिवस
रोगट कर्मठांची पिल्ला वळ .
तुमच्यामुळेच पेटली
मनामनात क्रांतीची धग
नसता ज्ञानकुंभ केला खुला
तर अंधारलेलेच असते जग
२८ नोव्हेंबर २०१७
महात्मा क्रांतिसुर्य ज्योतीबा फुले यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏💐💐💐💐💐🙏
Comments
Post a Comment